मुख्य बातम्यांकडे जा
गाव, शेती आणि समाजासाठी स्वतंत्र मराठी व्यासपीठ
आजच्या ताज्या बातम्यामराठी | महाराष्ट्र
⚡ ब्रेकिंग न्यूज
मुख्यपृष्ठ / बातम्या
महाराष्ट्र

हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप

 


मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध (Gokul dhudh) संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील आघाडीने 13-12 अशा फरकाने विजय मिळवला. मात्र, अद्याप दुध संघाच्या चेअरमनपदाची निवड झाली नसल्याने येथे चागंलाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या नेतृत्वातील आघाडीने येथे 12 जागा जिंकल्या असून अवघ्या दोन जागांसाठी त्यांचं चेअरमनपद हुकलं आहे. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या एका निर्णयामुळे येथील निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महायुती सरकारकडून गोकुळ दुध संघावर 4 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी दिली. त्यानंतर, विरोधकांनी (Jitendra Awhad) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरश: अब्रू गेली आहे, असा घणाघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आता सत्ताधाऱ्यांनी गोकुळवर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली असून लवकरच त्यांना मतदानाचा अधिकारही दिला जाईल. आव्हाड यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरुन पोस्ट लिहित सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली. ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही. आज त्यांनी गोकुळवर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे. लवकरच या सदस्यांना मताधिकार देखील ते प्रदान करतील. आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. 


आपले मत नोंदवा

Comments